Breaking


रुग्ण व डॉक्टरांचे उर्वरित प्रश्न लवकरच सोडविणार - आमदार विनोद निकोलेडहाणू (पालघर) : डहाणू जिल्हा रुग्णालय व तलासरी ग्रामीण रुग्णालय येथे भेट देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हडाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी रूग्ण, डाॅक्टर, कर्मचारी व जनतेचे विविध प्रश्न समजून घेतले.

यावेळी जिल्हा शैल्य चिकित्सक डाॅ.थाेरात, चंद्रक‍ांत गाेरखाना, तलासरी पंचायत समिती सभापती नंदू हाडल, डाॅ. आदित्य अहिरे, धनेश अकरे, डॉ. हिंगने उपस्थित होते.

रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी यांनी विविध प्रश्नांचा पाढा मांडला. हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉक्टर, अॅम्ब्युलन्स व कर्मचारी यांची कमतरता, पिण्याची पाण्याची दुरावस्था, डाॅक्टर व कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाची दुरवस्था, पेशंटला होणाऱ्या गैरसोय व डहाणू, तलासरी येथून गुजरातमध्ये स्थलांतरित होणारे पेशंट व इतर प्रश्नांवर त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार निकोले यांनी जिल्हा शैल्य चिकित्सक यांना दिले. 

जिल्हा शैल्य चिकित्सक यांनी आपल्या अख्यारित असलेले प्रश्न त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच धोरणात्मक प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच पाठपुरावा करणार असल्याचे तसेच डहाणू उपजिल्हा रुग्णालयाला 200 खाटांची मान्यता मिळवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आमदार निकोले यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा