Breaking

कॉ. रविंद्र जाधव यांच्या जिद्दीमुळेच होतेय ख्रिश्चन दफनभूमिचा कायापालट !


नांदेड - सीटू आणि माकप च्या यशस्वी प्रयत्नाने नांदेड येथील एकमेव ख्रिश्चन दफन भूमी चे गंभीर प्रश्न महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या निदर्शनास आणून देत आतापर्यंत चार वेळा आंदोलन करण्यात आले आहे. 


जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी संबंधित विभागांना कार्य तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु बांधकाम, विद्युत, पाणीपुरवठा व वित्त विभागातील काही कामचुकार अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक काम पूर्ण करण्यास विलंब केला आहे. साफसफाईचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून ते पूर्ण करावे तसेच दफनभूमितील अंतर्गत रस्ते, विद्युत पुरवठा, स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा व लोकसंख्येच्या आधारावर दहा एकर जमीन ख्रिश्चन दफनभूमिसाठी शासनाने महापालिका हद्दीत द्यावी, ह्या मुख्य व कळीच्या मागण्या अपूर्णच आहेत.

मागील अनेक आंदोलनात सातत्याने केलेल्या मागण्यांंना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाला कनिष्ठांनी केराची टोपली दाखाविली आहे. त्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच पुढील महिन्यात २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस नाताळ सण असल्यामुळे दफन भूमी येथे सर्व सुविधा पुरविण्यात यावेत, या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे कॉ. रविंद्र जाधव यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा