Breaking


आजच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या तीन बातम्या

1. नागपूर येथील शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंदच


महाराष्ट्र राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, परंतु नागपूर महानगरपालिका क्षेत्रात 13 डिसेंबरपर्यंत तरीही शाळा उघडणार नाहीत. हा आदेश नागपूर महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील अन्य भागात लागू होणार नाही.  


शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यावर शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी कऱण्यात आली होती ज्यात जिल्ह्यातील 41 शिक्षकांची रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. जिल्ह्यातील 6 हजार 823 शिक्षकांनी ही चाचणी केली होती. नागपूर शहरातील 16 तर ग्रामीण भागातील 25 शिक्षकांची पॉझिटीव्ह रिपोर्ट आली आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव बघता व शाळा सुरू होण्यापूर्वीच काही शिक्षक पॉझिटीव्ह आढळून आल्याने आयुक्तांनी महानगरपालिका क्षेत्रातील सरकारी तसेच खाजगी शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, पूर्वीप्रमाणे ऑनलाइन शिक्षण सुरू असणार आहे.


2. ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी रँकिंग मध्ये भारत 15 व्या स्थानी 


नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी रँकिंग अँड सर्व्हेनुसार आयआयटी दिल्ली मधील विद्यार्थी रोजगार मिळवण्याचा बाबतीत आघाडीवर आहेत. फ्रेंच एचआर कन्सल्टन्सी ग्रुप इमर्जिंग अँड टाइम्स हायरने प्रसिद्ध केलेल्या अहवालात विविध देशांतील विद्यापीठांची कामगिरी दाखविली आहे. या क्रमवारीत भारताने 15 वे स्थान मिळविले आहे. या सर्वेक्षण अहवालात कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ने पहिला, मेसाचुसुट्स  इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नी दुसरा तर हार्वर्ड युनिव्हर्सिटी ने तिसरा स्थान पटकावला आहे. सोबतच जर्मनी, चीन आणि दक्षिण कोरिया उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या  देशांमध्ये समिलीत झाले आहेत. 2010 मध्ये युके चौथ्या दुसऱ्या स्थानी होता तो आता 2020 मध्ये चौथ्या स्थानी आला आहे. या व्यतिरिक्त जपान आणि कॅनडाची रँकिंग पण घसरली आहे. तर दुसरीकडे, अव्वल 250 विद्यापीठांमध्येही भारताने आपले प्रतिनिधित्व वाढवले ​​आहे. 2019 मध्ये भारताच्या चार युनिव्हर्सिटी यात सामील होत्या त्या आता वाढून 6 वर गेल्या आहेत.


3. सीबीएसई ने घोषित केली 12 वी च्या प्रॅक्टिकल परीक्षेची तारीख


सीबीएसईने शनिवारी बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षेची तारीख जाहीर केली. 1 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत ही परीक्षा असेल. सीबीएसईने म्हटले आहे की ही तारीख संभावित आहे. नेमकी तारीख नंतर स्वतंत्रपणे कळविली जाईल. बोर्डाने परीक्षा घेण्यासाठी एसओपी देखील जारी केले आहे. बोर्ड एक निरीक्षक नियुक्त करेल जो व्यावहारिक परीक्षा आणि प्रकल्प मूल्यांकनांवर देखरेख ठेवेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा