Breaking
कॉम्रेड प्रकाश जंगम यांना माकपच्या वतीने आदरांजली सभासातारा : कॉम्रेड प्रकाश (भाऊ) जंगम यांंचे दु:खद निधन झाले. जंगम यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सातारा जिल्हा कमिटीच्या वतीने आंबेडकर पुतळा सभागृह, नगरपरिषद येथे आज आदरांजली वाहण्यात आली.


जंगम हे पूर्वी १९८० व १९९० च्या दशकात माकपच्या ठाणे जिल्हा कमिटीचे सदस्य होते. १९८० च्या दशकात सातारा जिल्ह्यात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) संघटनांच्या चळवळीत ते सक्रिय सहभागी होते. सातारा जिल्ह्यात पक्ष व जनसंघटनांसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांचे वडील बाबुराव जंगम हे धडाडीचे स्वातंत्र्यसैनिक होते.  जंगम यांच्या दुःखद निधनाची बातमी धक्कादायक असे माकपचे जिल्हा सेक्रेटरी माणिक अवघडे यांनी शोक व्यक्त केला आहे. जंगम यांना अखेरचा लाल सलाम माकपच्या वतीने करण्यात आले. 

यावेळी मणिक अवघडे, वसंत नलावडे, दत्ता राऊत, सलीम आतार, आनंदी अवघडे उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा