Breaking
दिपावली आणि बालदिनाच्या निमित्ताने जन - आधार सेवा संघाचा अनोखा उपक्रम!

अकोले (अहमदनगर) : जन - आधार सेवा संघाच्या वतीने राजूर व परिसरातील १५ गावांमधील दिव्यांग व निराधार मुलांसोबत बालदिन व दिवाळी साजरी करण्यात आली.यामध्ये जन-आधार सेवा संघाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तर अंध मुलांना पुस्तके, ब्रेल पाटी, सहाय्यकारी साधने यांचे वाटप करण्यात आले.


त्याचबरोबर सेवा संघाच्या वतीने विशेष 'दिवाळी किट' तयार करण्यात आली होती. हि किट तयार करण्यासाठी समाजातील दानशुर व्यक्तीनी 'सेवाभावी' तत्वावर मदत केली. दिवाळी किटमध्ये पणत्या, सॅनेटायझर, मास्क, मोती साबन, उटणे, सुगंधी तेल, व्हॅसलीन, चाॅकलेट, कॅडबरी, बिस्किट, फाराळाचा चिवडा, मिठाई यांचा समावेश करण्यात आला होता.


यावेळी किरण कोंडार, दिपक देशमुख, संजय देशमुख, कुंडलिक डामसे, गणेश देशमुख, पंढरीनाथ पोपेरे, प्रशांत देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. जन-आधार सेवा संघाच्या वतीने दिव्यांग व निराधारांसाठी विविध कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन करण्यात असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा