Breaking


ग्रामपंचायत आंबे पिंपरवाडी येथील विविध विकास कामांना आला वेग - सरपंच मुकुंद घोडे

जुन्नर (पुणे) : आंबे पिंपरवाडी ग्रामपंचायत मधील 14 व्या व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून गावातील माळवाडी, काठेवाडी, नामदेववाडी, आंबे व पिंपरवाडी या सर्व वाड्यावस्त्यांमधे येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हाय मॅक्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व वाड्यावस्त्यांच्या चौकामधील व चावडीवरचा अंधार दूर करण्याचे काम या वर्षीच्या दिवाळीला करण्यात आले आहे. 


गेल्या मे महिन्यापासून नवनिर्वाचित सरपंच यांनी पुढाकार घेऊन गावाच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. त्यामध्ये आता पर्यंत रोजगार हमी योजना चालू करून गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत आंबे व पिंपरवाडी येथे 50 शोषखड्डे व तीन पाणंद रस्ते मंजूर असून पुढील कामेही लवकरच चालू होतील.


या अगोदर रोजगार हमी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तसेच घाटातील रस्त्याच्या कामाची दुरुस्ती, मोरी दुरुस्ती, आंबे व पिंपरवाडी येथील डीपी दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर पिंपरवाडी येथे पाईप लाईन चे काम पूर्ण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय लोकांसाठी सुरळीतपणे चालू करून त्या ठिकाणी लोकांनां वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन कामे कशी करता येतील याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी झेरॉक्स मशीन व पी. सी ग्रामपंचायत मध्ये ठेवला आहे. सर्व लोकांपर्यत वैयक्तिक योजनांची माहिती दिली जात आहे. ग्रामपंचायतने आपल्या अजेंड्यावर अनेक विकास कामे घेतली असून पुढील काळामध्ये ती पूर्ण केली जातील, अशी माहिती सरपंच मुकुंद घोडे यांनी "महाराष्ट्र जनभूमी"शी बोलताना दिली.


14 व्या व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रस्तावित कामेही केली जातील. मागील पेंडींग असलेली कामे व त्यामध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्त करून लवकरात लवकर ती कामे सुरू केली जातील. तसेच रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत येणारी कामे ही लवकरात लवकर चालू करण्याचा मानस आहे.


या सर्व कामांमध्ये आंबे पिंपरवाडी गावाचे सरपंच मुकुंद घोडे, उपसरपंच अलका चिमटे, तसेच ग्रामपंचायत सदस्य गोविंद रेंगडे, भरत सावळे, रंजना घोडे, लता दांगट व मिरा डगळे त्याचबरोबर ग्रामरोजगार सेवक संदीप शेळकंदे यांनी ही सर्व कामे करण्यासाठी प्रयत्न केले.


त्याचबरोबर ही कामे करण्यासाठी ग्रामस्थ गणपत घोडे, ज्ञानेश्वर सावळे, संदीप रेंगडे, सोमनाथ ढेंगळे पिंपरवाडीचे पोलीस पाटील विष्णू घोडे, आंबे गावच्या पोलीस पाटील वैशाली शेळकंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा