Breaking


...त्यानंतरच त्या गावांच समावेश महापालिकेत करा; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करण्यात येेणार आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली असून अधी महापालिकेचा विकास करा आणि मगच त्या गावांचा समावेश महापालिका करा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पिंपरी चिंचवड सचिव गणेश दराडे यांनी केली आहे.


दराडे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेने ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता २० वर्षांपूर्वी काही गावे महापालिकेत समाविष्ट केली. त्या गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी विरोध केला होता. ग्रामपंचायतींना ग्रामसभा आणि शासकीय यंत्रणा मार्फत स्वतःचा विकास करता येतो. सोलापूरातील अकलूज ग्रामपंचायत महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि कार्यक्षम ग्रामपंचायत आहे. गावाच्या विकासाच्या नावाखाली रिअल इस्टेट आणि बिल्डर लॉबी यांच्या व्यावसायिक आणि आर्थिक हितासाठी गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे उद्योग राजकारणी करत असल्याचा आरोप दराडे यांंनी केला आहे.


पिंपरी चिंचवड महापालिकेला रस्ते, पाणी, आरोग्य, परिवहन इत्यादी सेवा ३८ वर्षात देता आल्या नाहीत. आजही लोक नागरी सुविधा मिळत नाहीत, म्हणून व्यथित आहेत. कोणतीही गावे ताब्यात घेण्यापूर्वी त्या गावाची निसर्ग संपदा, पशुधन, पंचायत राज व्यवस्था नष्ट होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.


भ्रष्टाचार आणि योजनांमधील दिरंगाई थांबवली आणि गरज आहे तिथेच खर्चाच्या योजना राबवल्या तर महापालिकेला पैशाची कमतरता जाणवणार नाही. त्यामुळे नवीन गावे महापालिकेत समाविष्ठ करण्यापूर्वी सरकारने आणि धोरणकर्त्यांनी लोकशाही पायदळी तुडवू नये, असे ही दराडे यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा