Breakingअ. भा. जनवादी महिला संघटनेच्या वतीने आयोजित ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर

पिंपरी चिंचवड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आयोजित ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. डॉ. अनिता काजळे, वैशाली इटकल यांंनी प्रथम क्रमांक पटकवला. नवरात्री निमित्त आयोजित केलेल्या ऑनलाइन रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर कारण्यात आला. कॉम्रेड अपर्णा दराडे, सोनाली मन्हास, अर्चना इंगोले, रंजिता लाटकर यांनी निकाल जाहीर केला.


१५ वर्षावरील वयोगटा साठी नारी एकता आणि नारी समानतेचा संदेश देणारी डॉ. अनिता काजळे यांच्या रांगोळीला आणि अतिशय रेखीव आणि सुंदर हस्तकौशल्य असलेली वैशाली इटकल यांची रांगोळी प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. तर मंगल मधुरे यांना द्वितीय क्रमांक, तर भारती कुरवर यांना तृतीय देण्यात आले. श्रुती पांडव, साक्षी साकुरे, ऍड.अश्विनी गायसमुद्रे यांना उत्तेजनार्थ देण्यात आले.


१५ वर्षाखालील वयोगटात अनुष्का लांडगे यांनी प्रथम क्रमांक पटकवला, या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक चषक(ट्रॉफी) सन्मान पत्रे तसेच सर्व सहभागींंना मेडल प्रदान करण्यात येणार आहेत. प्रा. मेघना भोसले, श्रीमती चारुशीला कडुलकर, अविनाश आवटे, सुमित देशमुख, सखी महिला बचत गट, अर्चना पवार, ऍड.मनीषा महाजन, शैलजा कडुलकर, सोनाली शिंदे यांनी पुरस्कार जाहीर केले.


कोरोना महामारीच्या कालखंडात सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमावर निर्बंध आहेत. महिला संघटना त्यांच्या सभासदांना नवीन कार्यक्रम देऊन सतत त्यांचा उत्साह वृद्धिंगत राहील याची काळजी घेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. ऑनलाइन रांगोळी स्पर्धा घेऊन ती यशस्वी करण्याचा हा महाराष्ट्रातील आमच्या संघटनेचा प्रयत्न यशस्वी झाला आहे, असे सोनाली मन्हास, अर्चना इंगोले यांंनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा