Breaking
... अन्यथा ही लढाई सोपी नाही - अरविंद जक्का

कामगार चळवळ टिकवण्यासाठी व्यापक एकजूटीची गरज


आकुर्डी : १०० वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकार कामगारांचे लढे अमानुषपणे चिरडत होते, त्या काळात कामगारांचे कामाचे तास कमी करून त्यांना किमान वेतन आणि इतर राजकीय कल्याणकारी हक्क मिळावेत, यासाठी आयटक या कामगार संघटनेची स्थापना झाली. थोर स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली १९२० साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस(AITUC) स्थापना करताना सर्व उद्योगातील कामगारांच्या शोषण मुक्तीसाठी ऐतिहासिक लढे यशस्वी करून भारतीय कामगारांना अनेक हक्क मिळवून देण्यात आले, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव मंडळ सदस्य अरविंद जक्का यांनी केले. ते श्रमशक्ती भवन, आकुर्डी येथील आयटक कार्यालयात आयटक शताब्दी सोहळ्या निमित्ताने बोलत होते.


पुढे ते म्हणाले की, विद्यमान सर्व कामगार कायदे रद्द करून मोदी सरकारने नवी श्रमसंहिता लागू करताना फक्त परदेशी भांडवल आणि कंपन्यांना मुक्त संचार दिला आहे. देशातील ४० कोटीहून जास्त असंघटित आणि उर्वरित संघटित कामगारांच्या नोकऱ्यांची आता खात्री राहिलेली नाही. वेतन निश्चिती, वेतन करार, कामाचे तास, आरोग्य सुविधा या विषयी आता कोणतेही अधिकार कामगाराकडे राहिलेले नाहीत. गत काळात मिळवलेले हक्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्व कामगार आणि कामगार संघटनांची व्यापक एकजूट केली नाही, तर भारतातील कामगार चळवळ इतिहास जमा होईल.


यावेळी अनिल रोहम, लता भिसे, व्ही. व्ही. कदम, एल. एस. मारू, एस. व्ही. गोडसे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा