Breaking

पिंपरी चिंचवड : रात्रीच्या संचारबंदीतून कारखान्यांना वगळा, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनची मागणी

 


पिंपरी चिंचवड : कोव्हिड काळातील संचारबंदीमुळे उद्योगाचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले होते. कामगारांचे जाणे येणे, कच्या मालाची वाहतूक यावर परिणाम होऊन अधिक आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी उद्योगांना संचारबंदीतून वगळावे, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सरकारकडे केली आहे.


पुणे पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील हजारो उद्योगामध्ये रात्र पाळी सुरु असते. मोठ्या कंपन्यांच्या ऑर्डर रात्री पूर्ण करून सकाळीच त्याची पाठवणी केली जाते. सरकारने 22 डिसेंम्बर पासून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचार बंदी जाहीर केल्यामुळे वाहतूकदार आणि कामगार वर्ग भयभीत झाला आहे.


पोलीस कारवाईच्या भीतीने कच्चा माल पुरवणारी वाहनांनी सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हजारो कामगार सेकंड शिफ्ट च्या परतीची काळजी करत आहेत. पोलीस खाते आणि सरकारने याबाबतीत छोट्या उद्योगाकडे दुर्लक्ष केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा