Breaking

मानव मुक्ती मिशन चा आज ५ वा वर्धापनदिन

 


औरंगाबाद : आधुनिक भारतात जातीअंताच्या प्रधान समस्येवर सर्वात मोठे काम कुणी केले असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच. परंतू बाबासाहेब गेल्याच्या नंतर त्यांच्या 'ॲनहिलेशन ऑफ कास्ट' या कार्याकडे भक्तांकडून डोळेझाक झाली. मात्र ठरवले की बाबासाहेबांचा जातीअंताचा लढा पुढे चालु ठेवायचा. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रोप्यमोहत्सवी वर्षानिमित्त २५ डिसेंबर २०१५ रोजी मानव मुक्ती मिशन या संघटनेची स्थापना केली. 


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले गुरु जोतीबा फुले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने २५ डिसेंबरला मनुस्मृती जाळली होती. त्यादिवशी केवळ स्त्रीयाच नव्हे तर भारतीय मानव ब्राम्हणी गुलामीतून मुक्त झाला होता, असे मानले जाते. म्हणून या कारणास्तव २५ डिसेंबर मानव मुक्ती मिशनचा स्थापना दिवस आहे.


२५ डिसेंबर २०२० रोजी मानव मुक्ती मिशनच्या वाटचालीस ५ वर्षे पुर्ण झालीत. कॉ. शरद पाटील यांच्या सौत्रांतिक मार्क्सवाद या तत्वज्ञानावर जातवर्ग स्त्रीदास्यान्तक समाजनिर्मीतीचे काम केले जात आहे.

 

समाजातील भेदाभेद, असमानता, कुठल्याही प्रकारचे शोषण, पिडन मानव मुक्ती मिशन नाकारते. देशात समता, मित्रता आणि न्यायाच्या पुनर्स्थापनेसाठी मिशन काम करत आहे. आपले साधुसंत "कोण्याही जीवाचा न घडो मत्सर l वर्म सर्वेश्वर पुजनाचे ll हा जो मानवतावाद सांगत होते, तोच मानव धर्म आम्हाला अपेक्षित आहे, असल्याचे मिशनचा ध्यास आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा