Breaking

उच्च दाबाच्या विज धक्क्याने शाळकरी विद्यार्थ्याचा चिंचेच्या झाडावरच मृत्यूसुरगाणा : तालुक्यातील वारपाडा येथे उच्च दाबाच्या विद्युत तारेचा शाॅक बसल्याने नरेश रामजी देशमुख वय 11 रा. बर्डा ता. वघई जि. डांग गुजरात याचा  चिंचेच्या झाडावरच मृत्यू झाल्याने हळहळत व्यक्त केली जात आहे. तो पाचव्या इयत्तेत सोनगढ व्यारा येथे जयसिंगपूर येथील आश्रम शाळेत शिकत होता.


या बाबत पोलिसांकडून अशी माहिती समजलेली की, नरेश व त्याची बहीण उमा हि दोघी भावंडे आई वडील पिंपळगाव भागात मजुरी करीता गेल्याने दहा ते बारा दिवसा पासून वावरपाडा येथे आजोबा बाळू गावित कडे रहायला आले होते. 25 जानेवारी रोजी सायंकाळी नरेश गावालगत असलेल्या चिंचेच्या झाडावर चढला गावात नवीन असल्याने विद्युत तारा झाडामधून गेल्या हे त्याच्या निदर्शनास आल्याच नाहीत. त्याच्या पायाचा स्पर्श तारेला झाल्याने जोरदार विजेचा धक्का बसल्याने त्याचा झाडावरच मृत्यू झाला. 


घरचे नातेवाईकांनी रात्री उशिरा पर्यंत घरी न परतल्याने तलाव, विहिरी आदि ठिकाणी शोध सुरु केला 26 जानेवारी रोजी भास्कर सुर्यवंशी हे शेतात गेल्याने अचानक त्यांचे लक्ष चिंचेच्या झाडाकडे गेले असता कोणीतरी झाडावर चढून बसले आहे मात्र हालचाल लक्षात न आल्याने जवळ जाऊन पाहिले असता हि बाब लक्षात आली. चिंचा तोडण्यास गेला अन जीव गमावून बसला. 


पोलिस पाटील पाडूरंग वाघमारे यांनी माहिती दिल्याने पोलिस उपनिरीक्षक निलेश बोडके, एम. के. पवार, गायकवाड यांनी पंचनामा केला असून अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा