Breakingअहमदनगर : न्यू आर्ट्स कॉलेज शेवगाव येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्नअहमदनगर (डॉ. कुडलिक पारधी) : दिनांक १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वत्र मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला आहे. शेवगाव तालुक्यातील न्यू आर्ट्स कॉलेजने देखील या पंधरवड्याचे आयोजन केले होते. त्यासाठी त्यांनी, मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तिनं दिवशीय आँनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. 


कार्यक्रमाणे पहिले पुष्प गुंफताना प्राचार्य. डॉ.पुरूषोत्तम कुंदे यांच्या अध्यक्षीय भाषणाने सुरुवात करण्यात आली. त्यांनतर ग्रामीण साहित्यीक व कांदबरीकार डॉ.कैलास दौंड यांचे 'इथे मराठीचिये नगरी' या विषयावर व्याख्यान झाले. तर दुसरे पुष्प गुंफण्यासाठी प्रा.चिंतामण धिंदळे यांना आमंत्रित केले होते. त्यांनी 'साहित्य आणि समाज' या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी अनेक लोकगीतांमधून समाजातील पंरपरा सांगताना साहित्याचा आणि समाजाचा अनुबंध जोडून दाखवला. 


तर तिसरे पुष्प गुंफण्यासाठी जेष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ.बाबुराव उपाध्ये यांना आमंत्रित केले होते. त्यांनी 'कथा कशी जन्माला येते' या विषयावर व्याख्यान देताना सांगितले की, "माझे साहित्य हे माझ जगणं आहे." या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. वसंत शेंडगे यांनी नियोजन केले होते. त्यांना या कार्यक्रमासाठी डॉ. अनिता आढाव,  एनएसएस चे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदिप मिरे, ग्रंथालय विभागाच्या प्रा. श्रीमती चक्रे यांंचे सहकार्य लाभले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा