Breaking
अहमदनगर : मराठी साहित्य मंडळाच्या वतीने कळसुबाई शिखर स्वच्छता मोहिम संपन्नअहमदनगर (गणेश धराडे) : मराठी  साहित्य मंडळाच्या वतीने कळसुबाई शिखर स्वच्छता मोहिम संपन्न झाली.


महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखराचा ऐतिहासिक पाऊलं वाटेचा वारसा घेऊन चालणारा अहमदनगर जिल्हा. याच मायभूमीत शुभ्र धुक्यात विसाव्याला निसर्ग रमणीय सौंदर्याने नटून थाट मांडणारा अकोले हा तालुका. या तालुक्याच्या टोकावर वसलेली व सह्याद्री पर्वत रांगेच्या वळणाने ‘बारी’ गावाच्या कुशीत वसलेली सर्व "भक्तांची कैवारी" व  महाराष्ट्र राज्याच भूषण म्हणजे "कळसुबाई ".


या ठिकाणी देशभरातून पर्यटक आपली प्रवास यात्रेचा आनंद द्विगुणित करतांना आपणास पहावयास भेटतात. परंतु या बरोबर निसर्गाची स्वच्छता भंग करताना पर्यटक दिसतात. या पार्श्वभूमीवर निसर्गाच्या सानिध्यात विसावा करून "स्वच्छता मोहीम राबुन, आपल्याच निसर्गाच संवर्धन करून वसुंधरेवर मायेची फुंकर घालतांना काही मुखवटे "बारी गावाच्या कुशीत आपल्यास पहावयास मिळतात.


निसर्ग काव्यांची सांगड घालून व संवर्धनाची प्रबळ जोपासना करणारे,  मराठी साहित्य मंडळ मुंबई, तालुका अध्यक्ष निसर्ग कवी तानाजी सावळे तसेच मराठी साहित्य मंडळाचे माऊली कंठ गायक, संगीतकार जालिंदर आडे, सीताराम जाधव, जयंत पटेकर, जयेश पटेकर तसेच परभणी जिल्ह्यातील कॉमेडी किंग युवराज फुलारे व अभिनेत्री शितल पाटील या विविध क्षेत्रातील कलाकार व बारी गावचे सरपंच, गावकरी मंडळी यांनी पण खूप मोठ्या जोमाने "स्वच्छता अभियान" सुरू केली आहे. नुकतेच या सर्वानी कळसुबाई परीसर स्वच्छता मोहिम राबवली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा