Breaking

अहमदनगर : आदिवासी युवकाची लघुऊद्योगाकडे वाटचाल, 'आदिबीज मशरूम'चा नैसर्गिक प्रकल्प ग्रामीण भागात

 


राजूर (अकोले) : महाराष्ट्रातील सह्याद्री मधील अथांग उंच डोंगराच्या पायथ्याशी अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यामधील शिरपुंजे हे गाव. अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी लोकवस्ती असलेले गाव गावातील सुशिक्षित तरूण महेश रामनाथ धिंदळे या आदिवासी युवकांने अकोले तालुक्यातील तरूणांसमोर एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करुन दाखवून दिले आहे.


नोकरी पेक्षा छोट्या मोठ्या लघु उद्योगामध्ये आपले करीयर नक्कीच करावे व अर्थिक उत्पन्न निर्माण करावे व प्रगती करावी. हा उद्देश ठेऊन त्याने घरीच 'मशरूम उद्योग' सुरू केला आहे. 


महेशने घरच्या घरी कमीत कमी जागेत व कमी खर्चामध्ये 'आदिबीज मशरूम' या नावाने हा गृहउद्योग सुरू केला आहे. आरोग्यासाठी मशरूम खाणे अगदी फायदेशीर आहे, याचे महत्त्व देखील तो पटवून देत आहे. फशरुम हे शुगर फ्री असते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स असतात. 


महेशने सुरु केलेल्या गृहउद्योग नक्की फायदेशीर ठरणार आहे. महेशच्या उद्योगाला पाठबळाची गरज आहे. आदिवासी युवकाने केलेल्या या उद्योग नक्की स्वयंरोजगाराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. परंतु इतरांना दिशादर्शक आहे.


अकोले तालुक्यातील पर्यटन क्षेत्रावर अनेक व्यावसायिक आपला आज उदर्निवाह करत आहेत. आदिवासी भागातील महत्त्वाचे व मुख्य शेती पिक म्हणजे भातशेती. 


महेश धिंदळे यांनी 'महाराष्ट्र जनभूमी न्यूज' शी बोलताना सांंगितले, "समाज बांधव व दानशूर व्यक्ती यांनी थोडीफार मदत केली तर नक्कीच चांगल्या प्रकारे, नैसर्गिक पद्धतीने मशरूम निर्मिती चा भव्य असा प्रकल्प निर्माण होईल व इतर तरूणांना देखील रोजगार ची संधी निर्माण होईल."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा