Breaking
अहमदनगर : विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 'युवा सप्ताह' संपन्न !अहमदनगर/डॉ.कुडलिक पारधी : शेवगाव येथील न्यू आर्टस् महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 'युवा सप्ताहाचे' आयोजन करण्यात आले. या उपक्रमअंतर्गत तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.


यात पाहिल्या दिवशी युवा अभ्यासक विवेक चते यांनी 'युवकांच्या नजरेतून स्वामी विवेकानंद' या विषयावर मारगदर्शन केले. तर दुसरे व्याख्याते समाजप्रबोधनकार अनिल केंगर यांनी 'स्वच्छ व स्वास्थ्य भारत अभियानाकरिता युवक' या विषयावर मागदर्शन केले. तिसरे व्याख्याते के. जे. सौमय्या महाविद्यालयाचे गणेश कुंजीर यांनी वित्तीय 'ई साक्षरता अभियान' या विषयावर मारगदर्शन केले. या व्याख्यानाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने गुगल मिट या माध्यमातून करण्यात आले होते.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे हे होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप मिरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश रहींज, उपप्राचार्य डॉ. अण्णासाहेब काकडे व मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीमती मिनाक्षी चक्रे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा