Breaking

आंबेगाव : उपोषणकर्त्या आदिवासी कातकरी महिलांची प्रकृती गंभीर, प्रशासनाचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

आंबेगाव : बोरघर जवळील जुने आंबेगाव येथे 'आमची ग्रामपंचायत कोणती ? असा सवाल करत अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आदिवासी कातकरी समाजाने जुने आंबेगाव येथील कातकरी लोकवस्ती व घरांची नोंद ही लगतच्या ग्रामपंचायतमध्ये करण्यात यावी, या मागणीसाठी बोरघर (ता.आंबेगाव) येथे दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बेमुदत उपोषण सुरू केले होते.


आज या उपोषणाचा ४ था दिवस आहे. मात्र प्रशासन आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या असंवेदनशील व हलगर्जीपणामुळे बेमुदत उपोषण करणाऱ्या ३ महिलांची प्रकृती अतिशय गंभीर झाली असून त्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालय याठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 


मागील ९ वर्षांपासून किसान सभा, शाश्वत संस्था या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहे, तेथील कातकरी समाजाला त्यांचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी कोणत्या तरी ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट होणे गरजेचे आहे. मात्र या अस्तित्वाच्या लढ्यासाठी आंदोलकांना अजून काय किंंमत मोजावी लागेल, असा सवाल नागरिक करत आहेत. 


प्रशासनाने मागण्यांवरती त्वरित निर्णय घेतला नाही तर , तीव्र आंदोलनाचा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष राजू घोडे यांनी दिला आहे. तसेच बेजबाबदार प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा