Breaking
भामरागड : डॉ. संतोष डाखरे यांच्या कवितेस प्रथम पुरस्कारभामरागड : नगरपंचायत भामरागडच्यावतीने   राबविण्यात आलेल्या सुंदर भामरागड स्वच्छ भामरागड या ऊपक्रमाअंतर्गत आयोजित काव्यलेखन स्पर्धेत डॉ. संतोष संभाजी डाखरे यांच्या कोरोना योद्धा या कवितेस प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.


प्रजासत्ताक दिनी आयोजित बक्षिस वितरण कार्यक्रमात डॉ. डाखरे यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. डाखरे हे राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत असून विविध व्रुत्तपत्रातून सामाजिक, राजकिय, आर्थिक व आंतरराष्ट्रीय विषयावर अभ्यासपूर्ण लिखाण करीत असतात. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतूक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा