Breakingभामरागड : राजे विश्वेश्वरराव कला, वाणिज्य महाविद्यालया मध्ये भूगोल दिन साजराभामरागड : राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालया मध्ये भूगोल विभागाच्या वतीने भूगोल दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रा. डॉ. कैलास निखाडे यांनी आपल्या प्रस्तावना मध्ये भूगोल महर्षी डॉ. सी. डी. देशपांडे यांचा 14 जानेवारी हा जन्मदिन राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. 


गेली 33 वर्षे पुण्यात हा दिवस विविध उपक्रम करून साजरा केला जातो. आजच्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने या दुर्लक्षित पैलूचा वेध. भूगोल या शब्दाचा सरळ अर्थ "पृथ्वीचा गोल' असा होतो. "भूगोल' हा शब्द इंग्रजीतील 'Geography' या शब्दासाठी पर्याय वापरला जातो. लॅटिनवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ "भूवर्णन शास्त्र'. "पृथ्वीवरील भौतिक व मानवी पर्यावरणातील रचना, क्रिया व आंतरक्रिया यांचा अभ्यास म्हणजे 'भूगोल' असे स्थूलमानाने मानले जाते. भूगोल म्हणजे मानव व पर्यावरण यांचा संबंध शोधणारे शास्त्र अशी देखील भूगोलाची व्याख्या केली जाते. भूगोलाची विभागणी प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल व प्रादेशिक भूगोल अशी केली जाते. प्राकृतिक भूगोलात भूरुपशास्त्र, हवामानशास्त्र, जैविक भूगोल यांचा समावेश होतो. 


तसेच यासोबत किनारी प्रदेश, खनिजस्त्रोत आणि नैसर्गिक आपत्ती यांचाही समावेश प्राकृतिक भूगोलात होतो. मानवी भूगोलात ऐतिहासिक भूगोल, सांस्कृतिक व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, आर्थिक व राजकीय भूगोलाचा समावेश होतो. प्रादेशिक भूगोलात पर्यावरणाचे व्यवस्थापन आणि विविध संसाधन स्त्रोतांचे जनन व संवर्धन यांचा समावेश होतो. भूगोलाच्या सखोल आणि सविस्तर अभ्यासात अनेकविध पद्धतींचा समावेश केला जातो. 


प्रत्यक्ष क्षेत्र निरीक्षण, नकाशे यांना भूगोलात महत्त्वाचे स्थान तर आहेच पण आजकाल दूरसंवेदी कृत्रिम उपग्रहांचा वापर, हवाई छायाचित्रण यांनी भूगोलाच्या निरीक्षण क्षमतेत क्रांतिकारक भर घातली आहे. त्यामुळे बदलत्या युगात भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अशी माहिती त्यांनी सांगितली. 


या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमराज लाड, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे, प्रा. डॉ. संतोष डाखरे, प्रा. डॉ. सुरेश डोहणे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा