Breaking
मोठी बातमी : भारत-चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा संघर्ष ; 20 सैनिक जखमी झाल्याची शक्यतानवी दिल्ली : भारत-चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा संघर्ष झाल्याची माहिती मिळत आहे. उत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्ये ही झटापट झाल्याचे सांगितलं जात आहे. या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाला एक दिवस राहिला असताना हा संघर्ष झाल्याने चिंता वाढली आहे.


पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असताना सिक्किममध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापटी झाली आहे. माध्यमातील माहितीनुसार, उत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्ये तीन दिवसांपूर्वी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी भारताने चोख प्रत्युत्तर देत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. उभय देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झडपेत दोन्ही देशांचे जवान जखमी झाल्याचे कळत आहे.


मागील आठवड्यात उत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय सैनिकांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. दोन्ही देशांच्या झटापटीत चीनचे जवळपास 20 सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे, तर भारताचे 4 सैनिक जखमी झाले आहेत.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा