Breaking
बुलढाणा : केंद्र सरकार लोकशाहीचे दमण करणारे सरकार - अतिशभाई खराटेबुलढाणा : देशाचा आधारस्तंभ असलेल्या शेतकऱ्यांच्या विरुद्ध काळे कायदे करून व मागील दोन महिन्यांपासून या कायद्याविरुद्ध दिल्लीमध्ये आंदोलन करीत या सरकारला आव्हान देणाऱ्या शेतकऱ्यांना व जनसामान्यांना उद्ध्वस्त करण्याचे तथा देशातील लोकशाहीचे दमन करण्याच कार्य केंद्र सरकार करीत आहे, केंद्र सरकारने हे शेतकरी विरोधी कायदे त्वरित रद्द करावे अन्यथा जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीतर्फे आमचा लढा तीव्र गतीने सुरूच राहील असे प्रतिपादन किसान बाग आंदोलनप्रसंगी बुलडाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी केले.


वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी "किसान बाग" आंदोलन आयोजित करण्यात आले होते, त्या अनुषंगाने दि. 27 जानेवारी रोजी मलकापूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर "किसान बाग" आंदोलन करण्यात आले.


या आंदोलनास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अतिशभाई खराटे बुलडाणा जिल्हा महासचिव, यशवंतराव कळासे जिल्हा उपाध्यक्ष, भगवानराव इंगळे जि. उपाध्यक्ष, भाऊराव उमाळे जि. संघटक, तुळशीराम वाघ जि. सचिव, जुल्फेकार हैदर तालुकाध्यक्ष जमाते इस्लामी हिंद यांची उपस्थिती होती तर नेतृत्व सुशील मोरे माजी तालुकाध्यक्ष, शेख यासिन कुरेशी माजी शहराध्यक्ष, संजय दाभाडे, विलास तायडे, गजानन झनके, राजू शेंगोकार यांनी केले.


यावेळी केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तथा प्रमुख मान्यवरांनी आपल्या भाषणातुन सरकारचा निषेध केला व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


या किसान बाग आंदोलनात रामभाऊ गवई, गणेश सावळे, भीमराज मोरे, प्रवीण इंगळे, मधुकर निकम, गौतम सरदार, विनोद वानखेडे, जाणूजी इंगळे, मनोहर जाधव, ज्ञानदेव खराटे, संघराज खराटे, आबाराव घुले, सुनील अहिरे, इलियास खान, कैलास बाविसाने, विलास वानखेडे, गौतम तायडे, राजू तायडे, विनोद इंगळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा