Breaking

चिंचवड : फत्तेचंद जैन विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजराचिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे जनरल सेक्रेटरी अॅड. श्रीमान राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी व शाळा समितीचे अध्यक्ष श्रीमान अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या. 


मान्यवरांचे स्वागत करुन सामुहिक संविधान उद्देशिकेचे वाचन विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सावळे शोभा यांनी केले. विद्यालयाच्या प्राचार्य सुनिता नवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपल्या मनोगतातून स्वातंत्र्य समता व बंधुता या मूल्यांची आठवण करून दिली. कोवीडच्या प्रादुर्भावर आपला देश यशस्वीपणे मात करत आहे, हाच आपला खरा प्रजासत्ताकाचा विजय आहे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य गुंजाळ अनिल, उपमुख्याध्यापिका जैन मनीषा, पर्यवेक्षक देवकाते सुभाष, विभाग प्रमुख शिरसाट संतोष, पाटील, वांजळे व शिक्षक शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला नाईक यांनी केले तसेच कार्यक्रमाचे संयोजन राजेंद्र पितळीया, एस. बी. नाडे व दाजी मदने यांनी केले. विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका मनीषा जैन यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा