Breaking

सायकल जत्था : महापाडाव आंदोलनासाठी पुणे ते मुंबई जत्था, आज आकुर्डी येथे मुक्काम

 


पिंपरी चिंचवड : दिल्लीतील शेतकरी आंदोलनास सायकल रॅली द्वारे पाठिंबा देणारा जत्था रांजणगाव, शिक्रापूर, चाकण तळवडे मार्गे आज आकुर्डी थरमॅक्स चौक, आकुर्डी येथे आला. विद्यार्थी, युवक, कामगार यांचा हा वाहनासाहित आलेला जत्था आकुर्डी श्रमशक्ती भवन येथे मुक्कामाला आहे.


कामगार संघटना संयुक्त कृती समिती,.माकप,.भाकप, डीवायएफआय, सिटू, आयटक, हिंद कामगार संघटना यांच्या वतीने हा जत्था काढण्यात आला आहे.आकुर्डी येथे जत्थ्याचे स्वागत गणेश दराडे यांनी केले. रॅलीचे नेतृत्व कैलास कदम, अजित अभ्यंकर करत आहेत. केंद्र सरकारने स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली नाही, कायदे रद्द करा, शेत मालाचे किमान मूल्य ठरवा अशी मागणी आंदोलक संघटनांनी केली आहे. 


शेतकरी आंदोलनावर सरकार दोन महिने होत आले तरी तोडगा काढताना दिसत नाही. या कायद्यामुळे शेती क्षेत्राचे खाजगीकरण होईल आणि पणन व्यवस्था कार्पोरेटच्या ताब्यात देण्याची सरकारची भूमिका आहे, असे अजित अभ्यंकर यांनी थर्माक्स चौक येथील सभेत सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा