Breaking
शेतकऱ्याच्या आंदोलनाला पांठीबा देण्यासाठी सीटू कामगार संघटनेचा जथ्था बीडहुन मुंबईला रवाना डॉ अशोक थोरातधारूर : केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी घेतलेल्या काळे कायद्याच्या विरोधात गेली ६१ दिवसापासुन दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडुन बसले आहेत.


२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर प्रयोग करण्याचे शेतकऱ्यानी ठरवले आहे. त्याच पार्श्वभूमीवर संबधीत देशभरात राज्याच्या राजधानी मध्ये राज्यपाल भवनावर घेराव आंदोलन करण्याची हाक शेतकरी संघर्ष समितीने दिली आहे. त्याचाच भाग म्हणुन किसान सभेच्या नेतृत्वाखाली राजभवणावर घेराव घालण्यासाठी २३ ते २६ नाशिक पासुन मुंबई पर्यंत वाहन जथ्था सुरू करण्यात आले आहे.


या आंदोलनाला पांठीबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातुन किसान सभा, सीटू, एसएफआय, डीवायएफआय, शेतमजुर इत्यादी सह अनेक जनसंघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने रवाना झाले असल्याची माहिती सीटू संघटनेचे जिल्हा सचिव डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा