Breaking
पिंपरी चिंचवड : सर्वत्र दैनंदिन वाहतुकीचा बोजवारा, खोदाईमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप


पिंंपरी चिंचवड : आकुर्डी विवेकनगर भाजीमंडईच्या नागरी वस्तीत गेले नऊ महिने महानगरपालिकेने विविध कामांसाठी प्रचंड मोठी खोदाई करून ठेवली आहे. यामुळे सर्वत्र दैनंदिन वाहतुकीचा बोजवारा झाला असून खोदाईमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.


विठ्ठलवाडी, दत्तवाडी, प्राधकरण, विवेकनगर, गंगानागर, तुळजाई वस्ती या मोठ्या परीसरासाठी या ठिकाणी एकमेव भाजी मंडई आहे. मुख्य रस्त्यावर स्टॉर्म वाटरसाठी मोठे चर खणले आहेत. भले मोठे पाईप याठिकाणी आणून ठेवले आहेत. सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खोदाईमुळे पाण्याची कानेक्शन्स तुटतात, विजवाहक तारा तुटतात. ही सर्व विकासकामे आता नागरिकांना नकोशी झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

सर्वत्र दैनंदिन वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. परिसरातून मुंबई पुणे महामार्गावर जाण्यासाठी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. घरामध्ये सर्वत्र धूळ पसरल्यामुळे सर्दी आणि घशाचे आजार होत आहेत, ही अर्थपूर्ण कामे लवकरात लवकर करावीत अशी मागणी विवेकनगर मधील नागरिक करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा