Breaking

महिला डॉक्टरांच्या बस ला भीषण अपघात; १० महिला डॉक्टर जागेवर ठारधारवाड, दावणगिरी येथे भीषण अपघात 


बेळगाव : गोवा येथे मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी दावणगिरी येथून निघालेल्या मिनी बसला टिप्परने दिलेल्या जोराच्या धडकेने भीषण अपघात असून, या अपघातात दहा महिलांसह ११ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास धारवाड तालुक्यातील ईट्टगट्टी गावाजवळ असलेल्या बायपासवर घडला आहे. मृतांमध्ये दहा महिलांचा समावेश आहे. दावणगिरीहून गोव्याला जाणारी मिनी बस आणि बेळगावहून हुबळीकडे जाणारा टिप्पर यांच्यात हा अपघात झाला असून, बसमधील काहींची प्रकृती गंभीर आहे, तर टिप्परमधील एकाचा मृत्यू झाला आहे.


दावणगिरी येथील एका क्लबच्या एकूण १७ महिला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गोव्याच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या. या भीषण अपघातात या महिलांवरच काळाने घाला घातला आहे. या अपघातात टिप्परने दिलेल्या मिनी बसच्या धडकेत मिनी बसचा चक्काचूर झाला असून, दहा जणींचा जागीच मृत्यू झाला आहे. वर्षिता विरेश (वय ४५) मंजुळा नटेश (वय ४७), राजेश्वरी शिवकुमार (वय ४०), वीणा प्रकाश (वय ४७) मल्लिकार्जुन तिमप्पा (वय २१), हेमलता (वय ४०), परम ज्योती (वय ४७), राजू सोमाप्पा (वय ३८), क्षीरा सुरेश (वय ४७), प्रीती राजकुमार (वय ४६) आणि यशमित (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. मिनीबसला लागलेली धडक आणि त्यानंतर बसचा झालेला चेंदामेंदा यामधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी उशीर झाला.घटनास्थळी धारवाड ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. अपघातातील इतर जखमींना किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धारवाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेंद्रकुमार यांच्या उपस्थितीत मिनीबसमध्ये अडकलेले दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर ५ महिलांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. जखमींवर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा