Breaking

कोल्हापूरात शेतकरी आंदोलनाच्या जनजागृतीसाठी जीप जत्था; मुंबई आंदोलनात सहभागी होणार


कोल्हापूर : सेंटर आॅफ इंडियन ट्रेंड युनियन्स (सिटू) ची कोल्हापूर जिल्हा कौन्सिल ची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये दिल्ली येथील किसान आंदोलनास सक्रिय पाठींबा देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार व नागरिक यांच्या जनजागृतीसाठी आणि मुंबई येथील धरणे आंदोलनातील सहभाग वाढविण्यासाठी २० ते २३जानेवारी कोल्हापूर जिल्हा किसान कामगार संयुक्त जीप जत्था काढण्याचा निर्णय घेतला. या जत्थ्यामध्ये सिटू आणि अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.


मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायदे व त्यांचे शेतकरी कामगार नागरिक यांच्या वरील परिणामांची माहिती पत्रके, कोपरा सभा, जाहीर सभा, घोषणा व गाणी या माध्यमातून देणार आहे. हा जथ्था कोल्हापूर, करवीर, कागल, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड, राधानगरी व पन्हाळा तालुक्यातून जाणार आहे.

२३ जानेवारी रोजी सकाळी १० वा. बिंदू चौक कोल्हापूर येथून सुरू होऊन २३ रोजी सायंकाळी वडणगे येथील जाहीर सभेने समारोप होईल. मोदी सरकारने सर्व कामगार कायदे रद्द करून चार श्रमसंहिता मंजूर केल्या आहेत. त्याद्वारे कामगार कर्मचारी वर्गाचे हक्क व सुविधा संपुष्टात आणण्याचा डाव आखला आहे, असा आरोप केंद्रीय कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने करत देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे.

बैठकीस शेतकरी नेते डॉ. उदय नारकर, कामगार नेते यांनी संबोधित केले. अध्यक्षस्थानी काॅ. चंद्रकांत यादव होते. यादव म्हणाले, तीन कृषी कायद्यामुळे रेशन व्यवस्था व अन्न सुरक्षा धोक्यात आली असल्याने हे आंदोलन सर्व सामान्य गोरगरीब जनतेचे आहे.

यावेळी प्राचार्य ए.बी.पाटील, सिटूचे जिल्हा अध्यक्ष भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, राजेश वरक, दत्ता माने, सुभाष कांबळे, संदीप सुतार, दिनकर आदमापुरे, आनंदा डाफळे, अमोल नाईक, नारायण गायकवाड, उज्वला पाटील, विमल अतिग्रे, मोहन गिरी, शिवाजी मोरे, रमेश निर्मळे, मनोहर सुतार, विजय कांबळे, कुमार कागले आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा