Breaking

जुन्नर : अखेर संघर्षाला यश; कोटमवाडी ग्रामस्थांचा गटविकास अधिकारी कार्यालयाला ९ तास घेरावजुन्नर (पुणे) : कोटमवाडी ग्रामस्थ आणि किसान सभेेेच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला ९ तास घेराव घालण्यात आला होता. 


अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटमवाडी ऑल कंपाउंट मनरेगा अंतर्गत बांधण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या 3 महिन्या पासून ग्रामस्थ प्रशासनाकडे मागणी करत आहे. परंतु प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे हे काम तीन महिन्यापासून रंगाळले होते. अखेर आज (दि. २२) घेराव घातल्यानंतर सदर कामास रात्री ९ वाजता प्रशासकीय मान्यता देण्यात आली.


तसेच लवकरच काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन विकास अधिकारी , सहाय्य गट विकास अधिकारी , शाखा उप अभियंता यांनी दिले. 


यावेळी किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, राजेंद्र शेळके, ज्ञानेश्वर शेळके, ज्ञानेश्वर गवारी, गणपत गवारी, मारुती गवारी, सुरेश सांगडे, नारायण सांगडे, ढवळा शेळके, किरण सांगडे, समीर शेळके, रामभाऊ गवारी, संपत गवारी, अमोल शेळके, विजय सांगडे हे ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा