Breaking
किसान आंदोलन : संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट

 


मुंबई : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आज संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्र यांच्या शिष्टमंडळाने खासदार शरद पवार यांची भेट घेतली.


यावेळी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलनाला येण्याची विनंती खासदार पवार यांना केली. विनंती स्विकारत खा. पवार यांनी मुंबई होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला येण्याची ग्वाही दिली.


संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या आवहानानुसार २३ ते २५ जानेवारी राजधानी मुंबई येथे ठिय्या आंदोलन करण्यात यजणार आहे. या ठिय्या आंदोलनात ५० हजार पेक्षा जास्त शेतकरी, कामगार सहभागी होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा