Breaking

बोरघर : किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी घेतली मजुरांची भेट; जाणून घेतल्या मजूरांच्या समस्या

घोडेगाव (पुणे) : बोरघर (घोडेवाडी) ता. आंबेगाव, जि. पुणे येथे चालू असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत चालू असलेल्या कामाला अखिल भारतीय किसान सभेचे आंबेगाव तालुका सचिव अशोक पेकारी व सुभाष भोकटे यांंनी सदिच्छा भेट दिली व मजूरसोबत चर्चा केली.


मजुरांना काम करत असताना विविध अडचणी येत होत्या. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजने संदर्भात मजुरांमध्ये प्रचंड समज - गैरसमज होते. यावेळी अशोक पेकारी यांनी मजुरांना येणाऱ्या सर्व समस्यांवर योग्य मार्गदर्शन केले व महात्मा गांधी रोजगार हमी योजना कशी योग्य आहे, तिचे काय महत्त्व आहे, हे मजुरांना पटवून दिले. 

कृषी विभागाच्या व वनविभागाच्या महात्मा गांधी रोजगार हमीच्या अंतर्गत विविध योजनांची माहिती सांगितली व त्या विषयी चर्चा केली. यावेळी किसान सभेचे तालुका उपाध्यक्ष कॉ.राजू घोडे, दिपक वाळकोळी, सुभाष भोकटे व रोजगार हमी वर काम करणारे ७० पेक्षा जास्त मजूर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा