Breaking


लोकमान्य टिळक महाविद्यालयात विधी सेवा शिबिर संपन्न : न्या. एल. एम. पठाण यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद



वडवणी : वडवणी शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयावर एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मतदार दिन, बालिका दिन, युवा दिन आणि मराठी भाषा साहित्य संस्कृती संवर्धन पंधरवडा या विषयाचा सहभाग होता.


वडवणी तालुका विधी सेवा समिती, वकील संघ,व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित एक दिवशीय शिबिरात वडवणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश एल. एम. पठाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून महाविद्यालयीन युवक-युवतींनी नियमांचे पालन करून आपले चारित्र्य व्यवस्थित ठेवून व व्यक्तिमत्व विकास करून, आपल्या पुढे येणाऱ्या विविध संधीचे सोनं करावं असे त्यांनी सांगितले.


मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी वडवणी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एल. एम. पठाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वडवणी पोलिस स्टेशनचे  पो.नि. नितीन मिरकर, वडवणी तहसीलदार मा. सय्यद कलीम अहमद, महाविद्यालयाचे अध्यक्ष पंजाबराव मस्के प्राचार्य डॉ. के. एम.पवार, वडवणी तहसीलचे शेख रफीक इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


प्राचार्य डॉ. के. एम. पवार यांनी प्रस्ताविक भाषणातून महाविद्यालयाच्या वाटचालीत महाविद्यालयाचे अध्यक्ष  पंजाबराव मस्के यांनी केलेले कार्य व तालुक्याचे शैक्षणिक केंद्रबिंदू ठेवलेले महाविद्यालय याविषयी माहिती दिली. वडवणी पोलिस स्टेशनचे पो.नि. नितीन निमकर, वडवणी तहसील कार्यालयाचे शेख रफीक, वडवणी तालुका वकील संघाचे एस.पी. डोंबाळे प्रा. अशोक खेत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

शिबिराचे सूत्रसंचालन वडवणी तालुका वकील संघाचे एस. ए.लंगे यांनी केले तर वकील महासंघाचे बी. बी. आंधळे यांनी आभार व्यक्त केले. या शिबिरामध्ये महाविद्यालयातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा