Breaking

शेतकरी आंदोलन : दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठी हिंसा; हिंसेचा संयुक्त किसान मोर्चाने केला निषेधनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांकडून आज ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. पण या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठी हिंसा झाली. काही शेतकऱ्यांनी थेट राजधानी दिल्लीत घुसून लाल किल्ल्यावर ताबा मिळवल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांकडून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनीही लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनीही मग मोठ्या प्रमाणात हिंसा घडवून आणल्याचं चित्र आज प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत दिसत आहे.


दरम्यान, नांगलोई परिसरात आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनीच रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिस थेट रस्त्यावर बसले होते. पुढे जायचं असेल तर आमच्या अंगावरुन ट्रॅक्टर चालवावा लागेल, असं आव्हानच पोलिसांनी शेतकऱ्यांना केल्याचे चित्र यावेळी दिसले. 


या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमनेसामने आले. त्यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. केंद्र सरकार, गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांनी याबाबत आधीच शंका व्यक्त केली होती आणि तेच चित्र आज दिल्लीच्या रस्त्यांवर पाहायला मिळालं.

 


दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने या हिंसेचा निषेध केला आहे. किसान मोर्चा मध्ये काही अराजक लोक घुसले असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने म्हंटले आहे. काही संघटना आणि व्यक्ती आज निंदनीय कृत्ये करत आहेत. शांततापूर्ण चळवळीत समाजकंटकांनी घुसखोरी केली आहे. शांतता ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे आणि कोणत्याही उल्लंघनामुळे केवळ शेतकरी आंदोलनाचे नुकसान होईल अशी प्रतिक्रिया संयुक्त किसान मोर्चाने दिलेली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा