Breaking

मूवी रिव्यू कागज : मृत व्यक्तीच्या 'कागदा'ची गजब कहानीमिर्झापुरचे कालीन भैय्या अर्थात पंकज त्रिपाठी यांचा नुकताच कागज चित्रपट प्रदर्शित झाला. निल बटे सन्नाटा, क्रिमिनल जस्टीस, सिक्रेट गेम, मिर्झापुर अशा विविध आव्हानात्मक भूमिके नंतर कागज या चित्रपटातुन पंकज त्रिपाठी यांनी आपली छाप प्रेक्षकांवर कायम ठेवली आहे. 


कागज या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी सरकारी कागदावर मृत पावलेल्या भरतलाल यांची भूमिका साकारली आहे. कागज हा चित्रपट उत्तर प्रदेश मधील भरतलाल यांच्या जीवनावर आधारित आहे. भरतलाल यांचे काका आणि काकू यांनी मृत घोषित करून भरतलाल यांची जमीन ताब्यात घेतली आहे. एक कागद किंवा प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रिये दरम्यान, लेखपाल ते मुख्यमंत्री यांच्यापर्यंत चर्चा सुरू आहे. त्यानंतर सरकारी कागदावर मृत पावलेल्या व्यक्तीला कागदावर स्वतःला पुन्हा जिवंत करण्यासाठी किती धडपड करावी लागली हे सांगण्याचे काम कागज चित्रपट करतो. पण वास्तविक खलनायक कागदच आहे.


भरतलाल हे कागदावर जिवंत राहण्यासाठी कागदावरुन कोर्टा पर्यंत जातात, परंतु काम होत नाही हे पाहून ते सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर करतात. प्रत्येक वेळी त्यांना तोंड द्यावे लागते. त्यांच्या संघर्षाच्या या प्रवासात त्यांची पत्नी, प्रेस रिपोर्टर, आमदार अशरफी देवी (मीता वशिष्ठ) आणि त्यांच्यासारखे सर्व पीडित मृतक संघटनेची स्थापना करून त्यांचे समर्थन करतात.


कागज चित्रपटातील वस्तुस्थिती आज ही समाजातुन संपलेली आहे असे नाही, आजही असे अनेक प्रकरणे आपल्याला दिसतात. केवळ एखादया व्यक्तीच्या नावे असणारी जमीन, जुमला हडपण्यासाठी असे मार्ग नातेवाईक कोणत्याही भीती शिवाय स्वीकारतात हे विशेष! मी देखील असे प्रकरण जवळून अनुभवलेले आहे, त्यावेळी सरकारी कागदावर मृत घोषित करून जमीन हडपल्यावर त्या व्यक्तीवर काय परिस्थिती ओढवते हे शब्दात सांगणे कठीण आहे.


कागज हा चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश कौशिक असून निर्माता सलमान खान आहे, तर चित्रपटात मुख्य भूमिकेत पंकज त्रिपाठी यांनी भरतलाल यांच्या भूमिकेत आहेत तर मोनल गुज्जर या भरत यांची पत्नी रुक्मिणीची भूमिका साकारली आहे, सतीश कौशिक, मिता वशिष्ट, संदीपा धार, अमर उपाध्याय, ब्रिजेंद्र काला हे आहेत. कागज हा चित्रपट झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.  


◾ कास्ट- पंकज त्रिपाठी, मोनल गज्जर, मीता वशिष्ठ, सतीश कौशिक, अमर उपाध्याय

◾डायरेक्टर- सतीश कौशिक

◾वेळ - 1 तास 49 मिनिटे

◾प्लेटफॉर्म - झी 5

◾रेटिंग - 4/5- विशाल पेटारे

- संपादक, महाराष्ट्र जनभूमी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा