Breaking

नाशिक : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भव्य बाईक रॅलीनाशिक : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एनटीयूआय संलग्न घंटागाडी कामगार संघटनेसह, किसान सभा व आयटक यांच्या वतीने भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली. रॅली सुरुवात  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालीमार येथून होऊन आंबेडकर पुतळा, नाशिक रोड येथे समाप्त  झाली.


शेतक-यांच्या विरोधात असलेले केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्यात यावेत तसेच शेतमालाच्या हमीभावाचा कायदा करण्यात यावा व कामगारविरोधी कायदे रद्द करण्यात यावेत यावेळी करण्यात आल्या. दिल्ली येथे शेतकऱ्यांवर होत असलेल्या असर्धुर लाठीहल्याचा निषेध कॉम्रेड राजू देसले यांनी केला. देशात शेतकरी, कामगार विरोधी कायदे केंद्र सरकार करत आहेत, CAA, NRC सारखे कायदे देशाची एकात्मता तोडण्यासाठी करत आहे, या निषेध करत असल्याचे देसले म्हणाले. 


काल मुंबईत हजारो शेतकरी मोर्चा घेऊन गेले आणि राज्यपाल पळून गेले हा शेतकऱ्यांनाचा अपमान केला आहे. कंगनाला भेटण्यासाठी राज्यपालला वेळ आहे मात्र शेतकऱ्यांंसाठी वेळ नाही, अशी बोचरी टिकाही देसले यांनी केली.


प्रस्तावित वीज बिल विधेयक रद्द करा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो, भारतीय सविधांन जिंदाबाद आदी घोषणा देण्यात आल्या.


रॅलीचे संयोजन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव महादेव खुडे यांनी केले. किसान सभा राज्यसचिव भाकप आयटक नेते कॉम्रेड राजू देसले यांच्या नेतृत्वखाली निघालेल्या मोर्चात रामदास भोंग, दत्तू तुपे, शिवनाथ जाधव, विठ्ठ्ल शिंदे, कैलास मोरे, शरद आहेर, लोटन मराठे, रफिक सैय्यद, नितीन सोनकांबळे, सुभाष गवारे, रवी पगारे, नाना सुर्यवंशी, विश्वास साळवे, बाजीराव सोनवणे, नाना नवर, राहूल अढांगळे, नागेश भोळे, नितीन शिराळ, कच्चेभान विधाते, श्याम प्रधान, राजू विटकर, गौतम नेटावणे, दिनेश वाघ, सुरेश गायकवाड, संतोष आल्हाट, रामदास गुंजाळ, शशिभाई उनवणे उपस्थित होते. राष्ट्रगीत ने रॅली समारोप करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा