Breaking
नाशिक : कॉम्रेड राजू देसले यांना समाजरत्न पुरस्कार


नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने दिला जाणारा 'सुर्यपूत्र यशवंत भिमराव आंबेडकर पुरस्कार' आयटकचे राज्य सचिव, किसानसभेचे राज्य सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड राजू देसले यांना देण्यात आला.


देसले यांचे परिवर्तनवादी चळवळीतील योगदान, शेतकरी कामगार चळवळीत झोकून देऊन केलेल्या कामाची दखल घेत सुर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंत भिमराव आबेडकर समाजरत्न पुरस्कार, सन्मान चिन्ह, सत्यशोधक विधी ग्रंथ, पुष्पगुच्छ देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच नाशिक चे संस्थापक अध्यक्ष अरुण जी. शेजवळ, ऍड. संतोष देवरे, ऍड. निलेश सोनवणे यांचा हस्ते आयटक कामगार केंद्र नाशिक येथे प्रदान करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा