Breaking


मोठी बातमी : शेतकरी आंदोलनामध्ये सिंधू बॉर्डरवर तणाव ; पालिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापरनवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डरवर स्थानिक लोक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाला आहे. स्थानिक आणि शेतकऱ्यांमध्ये भांडण झाले आहे. या गदारोळात अलीपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख जखमी झाल्याची माहिती येत आहे.


स्थानिक आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आहे. तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला आहे.


याआधी, गुरुवारी (28 जानेवारी) प्रशासनाकडून गाझीपूर बॉर्डरवर आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांना आंदोलन थांबवण्याचं आवाहन करण्यात आलं. याबाबत किसान आंदोलनाचे प्रवक्ते राकेश टिकैत यांच्याशी चर्चाही करण्यात आली. पण टिकैत यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून आंदोलनस्थळ रिकामे करणार नसल्याचं म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा