Breaking
पिंपरी चिंचवड : आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडीतील डीपी बॉक्सचे सेफ्टी ऑडिट करा - DYFIमहावितरण आधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे मागणी


पिंपरी चिंचवड : महावितरणने उघडे डीपी बॉक्स त्वरित दुरुस्त  करावेत, अयोग्य आणि बेजबाबदार देखभाली मुळे जीव जाण्याचा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे भोसरी, पिंपरी, निगडी, आकुर्डी परिसरातील सर्व डीपी बॉक्सचे सेफ्टी ऑडिट करावे, अशी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने अतिरिक्त आणि कार्यकारी अभियंता विभागीय, उप विभागीय यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


निवेदनामध्ये म्हटले आहे की, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, आकुर्डी गावठाण परिसरातील नागरी वस्ती, बँका आणि सार्वजनिक ठिकाणी सर्व डीपी बॉक्स उघडे आहेत. नियमानुसार विद्युत पुरवठा करताना विशिष्ट अँपिअर्सचे फ्यूज लावून डीपी बॉक्स कुलूप बंद करावेत. मात्र हार्डवेअर मधील लोखंडी तारा वापरून वीज प्रवाह सुरू ठेवलेला आहे.

 

रस्त्याच्या कडेला असलेल्या या डीपी बॉक्समुळे खेळणाऱ्या मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. गेल्या वर्षी उच्च दाबामुळे डीपी बॉक्स, रोहित्रे जळून जीवित हानी शहरातील काही भागात झालेली आहे. वीज कंपनीच्या वीजवाहक तारा जमिनीपासून अथवा इमारतीपासून योग्य त्या अंतरावरून जात नसल्यामुळे अपघात होऊन त्यात मनुष्य अथवा प्राण्यांस इजा होऊन जिवावर बेतते अथवा मालमत्तेचे नुकसान होऊन आग लागते. अशा परिस्थितीत महावितरणचा मेंटेनन्स विभागतील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कंत्राटदार यांच्यावर याच नियम ५८ ते ६४ चा भंग केल्यामुळे न्यायालयीन कारवाई होऊ शकते. नागरी वस्ती आणि सार्वजनिक ठिकाणी वीज वितरण करताना डीपी बॉक्स आणि रोहित्रे सुरक्षित राहावी. या करिता विद्युत कायदा व ग्राहक सुरक्षा, अधिनियम 2003/10 नुसार अतिशय सवेदनशील मार्गदर्शक सक्त नियमावली आहे,त्याचे उल्लंघन का केले जात आहे असा सवाल डीवायएफआयचे अमिन शेख, गौरव पानवलकर, सचिन देसाई, देवीदास जाधव यांनी केला आहे.


DYFI ने केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे :


1. आकुर्डी गाव, दत्तवाडी, विठलवाडी परिसरातील सर्व डीपी बॉक्सचे सेफ्टी ऑडिट करावे.


2. उघडे डीपी बॉक्स कुलुप बंद करून आयएसआय मानका प्रमाणे फ्युज लावावेत.


3. डीपी बॉक्स धोकादायक ठरणार नाहीत अशा प्रमाणित उंचीवर लावावेत.


4. नागरी वस्तीत विद्युत सुरक्षा कायदा, नियम, जबाबदारी, आपत्कालीन मदत आणि संपर्क क्रमांक याच्या माहितीचे सूचना फलक लावावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा