Breaking
पिंपरी चिंचवड : आधार केंद्रावर सोशल डिस्टन्सचा फज्जा, माहिती अभावी नागरिकांचा गोंधळ


पिंपरी चिंचवड : सरकारच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्स ठेवले पाहिजे. मात्र येथील संगणक कक्ष सरकारच्या कायद्याचे तीन तेरा वाजवणारा आहे. या केंद्रावर लोकांना योग्य मार्गदर्शन देणारा कक्ष वेगळा सुरू करावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर शाखेचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडुलकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.


अ प्रभाग प्राधिकरण आधार केंद्रावर नागरिकांची प्रचंड गर्दी आहे. विद्युत विभागाच्या शेजारी एका छोट्याश्या जागेत हे आधार केंद्र आहे. नवीन आधार कार्ड, चुकदुरुस्ती,पट्ट्यात बदल इत्यादी कामे येथे केली जातात. येथे कोणता फॉर्म कशासाठी भरावा याची माहिती देणारी खिडकी नाही. लोकांनी झेरॉक्स करून भरलेले फॉर्म इथे चालत नाहीत, असे सांगितले जाते. त्यामुळे रंगीत आधार फॉर्म घेण्यासाठी लोकांना पुन्हा रांगेत उभे राहावे लागते.

येथील कर्मचारी अतिशय उद्धटपणे वागताना दिसतात, त्यांनी जनतेला थोडी माहिती देऊन सहकार्य केल्यास लोकांच्या अडचणी कमी होतील. लोक तास तास रांगेत ताटकळत असतात. डिजिटल युगात एका व्यक्तीला किती वेळात सेवा देता येते हे ही येथील आधार केंद्र संचालकांनी नमूद करावे. लोकांना रजा टाकून, खाडे करून ही कामे करावी लागत असतील तर आधार केंद्र चालकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह का उपस्थित करू नये, असा सवाल आता नागरिक करु लागले आहेत.

26 लाख लोकसंख्येला आधार केंद्रे किती असायला हवीत याचा संबंधित प्रशासनाने विचार करावा. शहरात 128 वार्ड आहेत, त्यासाठी 128 आधारकेंद्रे सुरू करावीत. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या वार्डात सुविधा मिळेल. आधारकार्ड हा सरकारी दस्त ऐवज असल्यामुळे या केंद्राचा नफा तोटा या दृष्टीने विचार करू नये.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा