Breaking
पिंपरी : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भटक्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंंचे वाटपपिंपरी : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती, युवा दिनानिमित्त भाजपा भटके विमुक्त युवा आघाडी व मधुकर बच्चे युवा मंच यांच्या वतीने आकुर्डी, गुरुद्वारा परिसरात निवाऱ्यासाठी पाल ठोकून वास्तव्य करणाऱ्या गरीब व भटक्या कुटुंबाना कपडे, ब्लॅंकेट, स्वेटर, मास्क, सॅनिटांयझर आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.


महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य भाजपा पिंपरी चिंचवड शहर सचिव मधुकर बच्चे, भाजपा भटके विमुक्त युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौरभ  शिंदे यांच्या पुढाकाराने व नागरिकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. मधुकर बच्चे युवा मंचच्या वतीने बाराही महिने हा उपक्रम राबविण्यात येतो. हा उपक्रम लोकसहभागातून यशस्वी सुरू आहे.


यावेळी पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष संतोष खिंवसरा, सामाजिक कार्यकर्ते मारुती हाके, अशोक शिंगाडे, अभिजित पवार, गणेश बच्चे, राजू कोरे, भाईजान खान, द्वारकानाथ कुलकर्णी, गिरीश हंपे, उत्तम गारगोटे आदींनी विशेष प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा