Breakingपिंपरी : शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठी सरकार पुरस्कृत भाडोत्री लोकांनी हिंसाचार केला, कामगार आणि सामाजिक संघटनांचा आरोपपिंपरी (पुणे) :  26 जानेवारी 2021 रोजी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनामध्ये जो हिंसाचार झाला, त्याचा निषेध करण्यासाठी व गोडसेवादी विचारांना विरोध करण्यासाठी, महात्मा गांधी यांच्या बलिदान दिनी आज पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या स्थळी कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि किसान संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

 

भाडोत्री लोक पाठवून शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न केंद्र सरकारने केला. देशातील कामगार शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडित समस्या वाढल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेली आंदोलने देशद्रोही ठरवणारे सरकारचे प्रयत्न निषेधार्ह आहेत, असा आरोप कामगार नेते कैलास कदम यांनी केला.

 

तर शेतकरी आंदोलनाला देशद्रोही संबोधणारे आजच्या ढोंगी राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात गांधीवादाशी गद्दारी केली होती, असे मानव कांबळे म्हणाले. तर महात्मा गांधींची हत्या करणारा पहिला दहशतवादी नथुराम गोडसे होता. गांधी गेले पण गांधी विचार त्यांच्या हत्येमुळे जगभर पसरला. देशाचा स्वातंत्र्यदिन काळा दिवस साजरा करणारे आणि 50 वर्षे राष्ट्रीय ध्वाजारोहण ज्यानी केले नाही तीच विचारसरणी देशभक्ती शिकावत आहे. आम्ही शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत आहोत, असे डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे गणेश दराडे म्हणाले.

 

तर नवे कामगार आणि कृषी कायदे यावर संसदेच्या दोन्ही सदनामध्ये व्यापक चर्चा झाली पाहिजे. कोरोना काळात सरकार कायदे करण्यासाठी उतावळा झाले. सरकार कार्पोरेटच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप मारुती भापकर यांनी केला.

 

या आंदोलनात माकप, इंदिरा काँग्रेस, बारा बलुतेदार, नागरी हक्क सुरक्षा समिती, डीवायएफआय, जनवादी महिला संघटना, ओबीसी संघर्ष समिती, फेरीवाला क्रांती महासंघ, प्रहार जनशक्ती संघटना, स्वराज अभियान व अन्य संघटना सहभागी झाल्या होत्या.

 

यावेळी अनिल रोहम, गणेश दराडे, सलीम सय्यद, अपर्णा दराडे, काशिनाथ नखाते, इब्राहिम खान, भाई विशाल जाधव, संजय गायके, संदेश नवले, अजीज शेख, शिवराम ठोंबरे, मनोज गजभार, आनंदा कुदळे, काळूराम गायकवाड, गौतम गजभार, प्रदीप पवार व अन्य कार्यकर्तेउपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा