Breaking

पिंपरी : असंघटित कामगारांच्या वतीने शहीद महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी



पिंपरी (पुणे) : असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर तर्फे पिंपरी येथील संपर्क कार्यालयमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शहीद दिनी असंघटित कामगार काँग्रेस शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 2 मिनिट स्तब्ध राहून अभिवादन करण्यात आले.


तसेच दिल्लीच्या सीमेवर गेले 60 दिवस केंद्र सरकारचे काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. या आंदोलनामध्ये 177 शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच यावेळी केंद्र शासनाच्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. 


यावेळी महाराष्ट्र प्रदेश घरेलू महिला कामगार काँग्रेस समन्वयक शितलताई कोतवाल, मोहन उनवणे, हातगाडी टपरी पथरी विभागाचे जिल्हा समन्वयक अझरुद्दीन पुणेकर, शहर उपाध्यक्ष लहू उकरंडे, सौरभ खरात व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा