Breaking

राष्ट्रीय जनता दल : शेतकरी कायद्यांच्या विरोधात २४-३० जानेवारी 'किसान जागृक सप्ताह'बिहार : शेतकरी कायद्यांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी २४ - ३० जानेवारी 'किसान जागृक सप्ताह' चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी दिली.


शेतकरी कायद्यांच्या विरोधात केंद्र सरकारची कोंडी होताना दिसत आहे. केंद्र सरकारने दिलेला प्रस्ताव फेटाळल्यानंतर आरजेडी ने घेतलेल्या निर्णयानंतर बिहारमध्ये भाजप पुन्हा पिछाडीवर जाण्याची चिन्हे दिसत आहे. तर संयुक्त किसान मोर्चाने २६ जानेवारी रोजी दिल्लीत 'किसान परेड' ची घोषणा केली आहे. तर प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये 'महापाडव' आंदोलन होणार आहे.


 

देशाच्या आर्थिक राजधानीत ही 'महापाडाव'


देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 'शेतकरी - कामगार संयुक्त समिती' च्या वतीने 'महापाडव' आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला भाजप वगळता सत्ताधारी शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षांसह सर्व पक्षांंचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा