Breaking




ग्रामीण भागात ठप्प असलेली एस.टी. बस वाहतूक विद्यार्थ्यांसाठी पूर्ववत करा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांची मागणी



मुंबई : राज्यातील खाजगी व शासकीय माध्यमिक व प्राथमिक इ. ५ वी ते ८ वी च्या शाळा २७ जानेवारी पासून सुरू होत आहेत मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ठप्प असलेली एस.टी. बस वाहतूक विद्यार्थ्यांसाठी पूर्ववत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब व शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे कि, कोरोना लाॅकडाऊनच्या काळानंतर शाळांना शासकीय नियमाचे पालन करत शासनाने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. आता दि. २७ जानेवारी पासून इ. ५वी ८वी या ही शाळा सुरू होत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरी भागाकडे शाळांसाठी प्रवास करत असतात मात्र अजूनही ग्रामीण भागातल्या एस. टी बसेस सुविधा सुरू नाहीत त्यामुळे विद्यार्थी खाजगी वाहनाने प्रवास करत असतात त्यांचा आर्थिक भुर्दंड या विद्यार्थ्यांना सोसावे लागत आहे तरी शासनाने ही एस.टी बस सुविधा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी परमेश्वर इंगोले पाटील यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा