Breaking

सांगली : किसान विरोधी काळे कायदे रद्द करा; कवठेमहाकाळ येथे लाक्षणिक उपोषणकवठेमहांकाळ (सांगली) : किसान विरोधी काळे कायदे रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन कवठेमहांकाळ येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.


किसान संयुक्त मोर्चाच्या आवाहनानुसार दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या दडपशाही विरोधात आज संपूर्ण देशभर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ येथे आज (दि.30) शहीद महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून उपोषणाला सुरुवात करण्यात आली. 


यावेळी दिल्ली शेतकरी आंदोलनामध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. देशमध्ये शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पार्टी ने चालवले आहे. व शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सध्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने चालवला तो सर्व शेतकऱ्यांनी हाणुन पाडावा असे मत बळीराजा पार्टी चे महासचिव बाळासाहेब रास्ते यांनी व्यक्त केले.यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अविराजे शिंदे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शेतकरी आंदोलन जिल्ह्यामध्ये तीव्र करण्याचा इशारा किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉ. दिगंबर कांबळे यांनी दिला. यावेळी प्रा.दादासाहेब ढेरे, अल्लबक्ष मुल्ला, बळीराजा पार्टी चे अध्यक्ष अंबादास जाधव, दिव्यांग संघ चे शाहाजी गोंधळे, बाळासाहेब पाटील, काँग्रेस सेवा दलाचे पोपटराव पाटील, चैतन्य पाटील, मुबारक मुल्ला, अंकुश रास्ते व शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा