Breaking
दिल्ली शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात केज मध्ये शेकापचा ट्रॅक्टर मोर्चाकेज : दिल्ली येथे तीन कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज केजमध्ये ट्रॅक्‍टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देऊन तहसील कार्यालयावर चाळीस ते पन्नास ट्रॅक्टर मोर्चा संपन्न झाला.


तहसीलदार यांच्या मार्फत केंद्र सरकारला निवेदन पाठवले, शहरांमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ता यांनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी शेतकरी आंदोलनाची दखल घेत नसेल तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या मोर्च्याला रिपब्लिकन सेना, वंचित आघाडी, केज संघर्ष समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.


केंद्र सरकारने पारित करण्यात आलेल्या तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावेत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, सक्तीची वीज बील वसुली थांबवा या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. 


या प्रसंगी ३५ ते ४० ट्रॅक्टर  स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले, या वेळी शेकापचे ज्येष्ठ नेते भाई बाबुराव जाधव, प्रा हनुमंत भोसले, नारायण गोले, भिमराव कुटे, वजीर शेख, अमोल सावंत, प्रवीण खोडसे, अशोक रोडे, जी डी देशमुख, निखिल बचुटे, मंगेश देशमुख, अशोक डोंगरे, प्रमोद पवार, सोळुंके लहू, अभिमन्यू जाधव, हनुमंत मोरे, हनुमंत नेहरकर, शेहबाज फारोकी, किरण परवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा