Breaking

धक्कादायक : आदिवासी गरोदर महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने पोटातील बाळासह महिलेचा दुर्दैवी मृत्यू

 


आंबेगाव (पुणे) : फलोदे (ता. आंबेगाव) येथील गर्भवती महिला व बालकाच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेने निवेदनाद्वारे चौकशी समितीचे अध्यक्ष जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्याकडे केली आहे.


आंबेगाव तालुक्यातील पुर्व दुर्गम आदिवासी भागातील फलोदे या गावातील पूनम दत्तात्रय लव्हाळे या महिलेच पोटातील बाळासह उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे दगविल्याचा दुर्दैवी घटना घडली.


या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली.


समितीचे अध्यक्ष नांदापूरकर यांना किसान सभेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर, सचिव अशोक पेकारी व उपाध्यक्ष राजू घोडे यांनी निवेदन देत संबंधित दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.


निवेदनातील मागण्या पुढीलप्रमाणे : 


 ■ प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेघर येथे रात्री उपलब्ध होवू न शकणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई करावी.


■ प्राथमिक आरोग्य केंद्रापासून घोडेगावला शासकीय रुग्णवाहिका कशामुळे उपलब्ध झाली नाही ते पाहून यास जे कारणीभूत असतील त्या संबंधितावर कारवाई व्हावी.


■ प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेघर व आंबेगाव तालुक्यातील सर्वच आदिवासी भागात निवासी डॉक्टर उपलब्ध व्हावेत.


■ प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर, अडवीरे व तिरपाड येथील विविध तक्रारी विषयी जनसुनवाई घ्यावी.


■ ग्रामीण रुग्णालय, घोडेगाव येथे सदरील महिलेवर कोणतेही उपचार न करणाऱ्या डॉक्टर यांच्यावर कडक कारवाई व्हावी.


■ ग्रामीण रुग्णालय, घोडेगाव यांच्या कामकाज विषयी खूप साऱ्या तक्रारी आहेत याविषयी स्वतंत्र बैठक आयोजित करावी किंवा जनसुनवाई आयोजित करावी.


■ घोडेगाव येथून व मंचर येथून १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही, यास जबाबदार १०८ व्यवस्थेचे प्रमुख यांचेवर व सबंधित डॉक्टर, कर्मचारी यांचेवर कारवाई व्हावी.


■ तळेघर येथील ग्रामीण रुग्णालय त्वरित सुरु करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा