Breakingदिल्ली शेतकरी अंदोलनाला बार्शीमध्ये मोटारसायकल रॅली काढुन पाठिंबाबार्शी : अखिल भारतीय किसान सभा, बार्शी तालूका कौन्सिलच्या वतीने 26 जानेवारीला दिल्ली येथे केंद्र सरकारने संमत केलेले तिन कृषी कायदे रद्द करावे यासाठी चालू असलेले आंदोलन व टॅ्‍क्टर रॅलीस पाठिंबा दर्शवण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. हि रॅली काॅ. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्वक वातावरणात काढण्यात आली.  


हि रॅली भगवंत मैदान येथून निघून बार्शी शहराच्या मुख्य रत्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर पोहचून तेथे सभेत रूपांत झाले.  यावेळी मोटारसायकवरून शेतकरी व कार्यकर्ते जय जवान जय किसान, तिन काळे कृषी कायदे रद्द करा अशा घोषणा देत होते.


यावेळी झालेल्या सभेत काॅ. तानाजी ठोंबरे म्हणाले कि, केंद्र सरकार हुकूमशाही पध्दतीने वाटचाल करीत आहे, देशातील सर्वात मोठा घटक शेतकरी हे कायदा रद्द करण्याची मागणी करीत असताना देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे षडयंत्र आखले जात आहे, परंतू कोणतीही तमा न बाळगता हे आंदोलन कायदे रद्द मागे घेवूनच थांबेल. यावेळी किसान सभेचे काॅ. लक्ष्मण घाडगे यांचेही भाषण झाले.


हि रॅली यशस्वी करण्यासाठी किसान सभेचे काॅ. लक्ष्मण घाडगे, पैगंबर मुलाणी, काॅ. बाळासाहेब जगदाळे, सुनील जावळी, आयटक संलग्न डाॅ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाचे काॅ. लहू आगलावे, काॅ. धनाजी पवार, काॅ. भारत भोसले, किसान मूळे, अनिल शिंदे, अंनिसचे प्रा. ए.बी. कदम, विनायक माळी, ग्रामपंचायत संघटनेचे काॅ. ए. बी. कुलकर्णी, रशिद इनामदार, बांधकाम कामगार संघटनेचे काॅ. अनिरूध्द नखाते, बालाजी शितोळे, शाफीन बागवान, संतोश मोहिते, आयटक महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटनेचे काॅ. प्रविण मस्तुद, परमेश्‍वर पवार, उमेश मदणे, सुधीर सेवकर, आॅल इंडिया स्टुडंन्टस फेडरेशनचे काॅ. पवन आहिरे, भारत पवार, दिपक कोकाटे, तूषार कांबळे, अविराज चांदणे, बैक संघटनेच्या सरिता कुलकर्णी आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा