Breaking

सुरगाणा : देवगाव येथे बांबू क्लस्टर केंद्राचे उद्घाटनसुरगाणा : वन संपत्तीने विपुल असलेल्या सुरगाणा तालुक्यातील देवगाव येथील स्थानिकांना अवगत असलेल्या पारंपारिक हस्तकलेला आधुनिकतेची जोड प्राप्त व्हावी, तसेच उपजत असलेल्या कलेचे जतन होऊन स्थानिकांचा सर्वांगीण विकास होईल, या उद्देशाने नाशिक पूर्व विभागाने महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाच्या आर्थिक साहाय्याने उंबरठाण वनपरिक्षेत्रातील मौजे देवगाव येथे उभारलेल्या सामायिक सुविधा केंद्राचे ता. 9 महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक टी. एस.के.रेड्डी यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले. 


या कार्यक्रमा वेळी प्रमुख अतिथी म्हणून विभागीय समन्वयक बी.पी.पवार, सुरगाणा उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक हेमंत शेवाळे, गोंदूने गृप ग्रामपंचयातीचे सरपंच रमेश वाडेकर, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवार आदी उपस्थित होते.


या केंद्रात बांबूपासून विविध शोभिवंत व कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याकरिता आवश्यक असलेल्या साधन सामुग्री जसे की फोर साईड प्लेनर कट ऑफ मशीन, डिस्क सॅनडर, नॉट रिमोव्हर, पॉलिश मशीन इत्यादी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. स्थानिक कारागिरांना या साधन समुग्रीच्या साहाय्याने वस्तू बनविण्याकरिता दि. 18 जानेवारी पासून तज्ञ प्रशिक्षकांच्या टीम मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उपलब्ध करून देण्यात आलेल्या साधनसामुग्रीचा स्थानिकांनी पुरेपूर व योग्य वापर करून चांगल्या दर्जाच्या शोभिवंत व कलाकुसरीच्या वस्तू तयार करून चांगले आर्थिक उत्पन्न प्राप्त करून गावाच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलावा अशी अपेक्षा प्रमुख पाहुण्यांकडून व्यक्त करण्यात आली. 


या केंद्राच्या उभारणी करीता सुरगाणा चे सहाय्यक वनसंरक्षक हेमंत शेवाळे, उंबरठाण चे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे व टीम उंबरठाण यांनी विशेष मेहनत घेतली. मुख्यवनसंरक्षक गुदगे, पूर्वभाग नाशिक चे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळाचे विभागीय समन्वयक बी. पी. पवार यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा