Breaking

तळेघर : नांदेड येथील पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करा, कँडल मार्च काढून केली मागणी


आंबेगाव (पुणे) : नांदेड येथील पाच वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार व तिची केलेली हत्या केली. या घटनेचा निषेध करत तळेघर (ता. आंबेगाव) येथे कँडल मार्च काढत निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात १०० पेक्षा अधिक महिला, युवती, युवक सहभागी झाले होते.

या आंदोलनाच्या वेळी तळेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील हलगर्जीपणामुळे ज्या महिला व बाळाचा मृत्यू झालेला आहे त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. आरोग्य व्यवस्थेच्या गलथान कारभारामुळे आता कोणाचा बळी जाऊ द्यायचा नाही असा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला.

किसान सभेच्या वतीने आरोग्य व्यवस्थेतील सुधारणासाठीचे तळेघर येथे सुरू असलेल्या बेमुदत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

यावेळी किसान सभेचे आंबेगाव तालुका सचिव अशोक पेकारी, उपाध्यक्ष राजेंद्र घोडे, गणेश काटळे,  महेश गाडेकर तसेच तळेघर, फलोदे, राजपुर, सावरली येथील गावांतील अनेक व्यक्ती उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा