Breakingसरकारने साष्टपिंपळगाव येथील ठिय्या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी - आ.विनायक मेटेमराठा संघटनांचे नेतृत्व अनेक असले तरी उद्देश, मागणी, धोरण व कार्यक्रम एक असावे - आ. मेटे


जालना : साष्टपिंपळगाव ता. अंबड जिल्हा जालना येथे मागील दहा दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला आमदार विनायक मेटे यांनी आज भेट दिली. 


त्याप्रसंगी आ. मेटे यांनी उपोषणकर्त्त्यांशी, आंदोलकांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीवर राज्य सरकार गंभीर तर नाहीच उलट स्थगिती आल्यापासून राज्यसरकारच्या विविध विभागांमध्ये जसे की आरोग्य विभाग, गृहविभाग, शिक्षण विभाग व उर्जा विभागांमध्ये भरती काढण्याची चढाओढचं लागली आहे. एवढे कमी होते म्हणून की काय आघाडी सरकारने मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले ते अनेक विभागाच्या भरती जाहीर केल्याच्या माध्यमातुन. त्याची भरती प्रक्रियेला सुरुवात पण करण्यात आली. आरोग्य खात्याची १७५०० पदांची भारती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केली. तर गृह खात्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १२५०० पदांची भरती, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हजारो लोकांची भरती केली आणि २०-३० हजार लोकांची भरती करणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा  गायकवाड यापण मागे राहिल्या नाहीत. त्यांनी पण मोठ्या प्रमाणात भरती करण्याचे आदेश दिले आहेत. अशा अनेक विभागाच्या मंत्र्यांनी नोकर भरतीची तयारी केली आहे. दुर्दैव आपले यामध्ये असे आहे, कि विरोधामध्ये एकही मराठा मंत्री मंत्रीमंडळामध्ये भरतीला विरोध करत नाही. मराठा समाजाच्या बाजूने बोलत नाही.


राज्य सरकारच्या मंत्रीमंडळातील जबाबदार मंत्री गायकवाड अहवालाला बोगस अहवाल आहे असे म्हणून राज्यघटनेचाच अपमान करत आहेत अशी बोगस वक्तव्ये करणाऱ्यांना वेळीच लगाम लावावा असेही मेटे यांनी सांगितले. 


एका बाजूला आघाडी सरकार मराठा आरक्षण वाचवू शकत नाही, अंतरिम स्थगिती आली आहे. दुसऱ्या बाजूला स्थगिती आल्यानंतर, मराठा समाजाची मुले -मुली यांना  नौकरीसाठी व शिक्षणासाठी लाभ मिळणार नाही अशी रणनिती आघाडी सरकारने आखलेली आहे. म्हणून अगोदर एमपीएससीच्या परीक्षा जाहीर केल्या. अनेक जाचक अटींच्या घोषणा एमपीएससीचे अध्यक्ष श्री. सतिष  गवई  यांनी जाहीर केली व तसे पत्रक काढले. त्यामुळे मराठा समाजाच्या मुलांचे नुकसान होणार आहे. मेडिकल, इंजिनियर व इतर विभागाचे प्रवेश आघाडी सरकारने स्थगिती आल्यानंतर व EWS देण्याच्या अगोदर पूर्ण केले. यामुळे हजारो मुले-मुली डॉक्टर - इंजिनियर होण्यापासून वंचित  राहिलेत . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वाटोळे झाले असून हे पाप या सरकारने केले आहे.  


या निर्दाड सरकारला जागे करण्यासाठी येत्या ७ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी एल्गार मेळाव्याची सुरुवात जालना येथुन सुरु करत असुन नागपुर, मुंबई, बारामती सह राज्यभरातील इतर ठिकाणीही करणार आहोत त्यामध्ये समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ही आ.विनायक मेटे यांनी या प्रसंगी केले. 


मागिल दहा दिवसांपासून साष्टपिंपळगाव येथेल उपोषणकर्त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला आहे त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांना आ. मेटे यांनी आंदोलन चालु ठेवावे मात्र उपोषण सोडण्याची विनंती केली यावेळी मोठ्यासंख्येने समाजबांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा